सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व, प्रा. डॉ. जयंत कुमार रामटेके

आपले शरीर स्वस्थ व सुदृढ राहावे,असे प्रत्येकालाच वाटत असते पण वेळेअभावी व्यक्तीची
इच्छा असूनही शरीर स्वास्थ्याकडे आपण फारसं लक्ष देऊ शकत नाही .पण वेळ काढून
प्रत्येकाने तरी काही वेळ आपल्या शरीर स्वास्थ्याला द्यायला पाहिजे.आरोग्य उत्तम तर शरीर
उत्तम..आरोग्यासाठी जसे आरोग्य महत्वाचे तसेच सूर्यनमस्कार. उत्तम आरोग्यसाठी प्रत्येकाने
सूर्यनमस्कार केले पाहिजे. योगप्रमाणेच सूर्यनमस्कार करण्याची एक विशिष्ट प्रकारची विधी
आहे.ती विधी व सुर्यनमस्काराचे प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखनाचा उद्देश आहे
सूर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या
रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले
जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर
सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि
त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि
सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.उगवत्या व मावळत्या्
सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने
करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि

Comments